Uncategorized

आरपीडीचे सेवानिवृत्त शिक्षक जी.ए. बिरंबोळे यांचे निधन

सावंतवाडी : येथील आरपीडी हायस्कूलचे गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुणवंतराव बिरंबोळे ( ७० ) यांचे किरकोळ आजाराने कोल्हापूर वारणानगर येथे बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या आरपीडी हायस्कूलमध्ये तसेच दोडामार्ग हायस्कूलमध्ये त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले. आरपीडी हायस्कूलमध्ये ते नोकरी करत होते. परंतू सावंतवाडीतील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. आरपीडी हायस्कूलमध्ये अनेक वर्षे त्यांनी एन.सी.सी. ऑफीसर म्हणून काम केले. दि.२३ एप्रिल २०२६ रोजी आरपीडी हायस्कूलमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, जावई व नातू आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​