Uncategorized

Solapur News | मटण व्यवहारातील ७ हजारांचा वाद पेटला; सोलापुरात मटण दुकानदाराकडून ग्राहकाला बेदम मारहाण

                   सोलापुरात ७ हजारांच्या वादातून मारहाण

सोलापूर: संतोष नगर (बाळे) परिसरात मटन व्यवहारातील सात हजार रुपयाच्या वादातून एकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी मंगेश महादेव कांबळे (रा. संतोष नगर, बाळे) हे २० एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपी प्रथमेश क्षीरसागर यांच्या कुलस्वामिनी मटन शॉपवर बोकडाच्या व्यवहारातील सात हजार रुपये मागण्यासाठी गेले होते.

यावेळी आरोपी प्रथमेश क्षिरसागर राज क्षीरसागर, संतोष क्षीरसागर आणि नागनाथ क्षीरसागर यांनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांचा मित्र विजय काटकर यांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आरोपी प्रथमेश क्षीरसागर याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या गुडघ्यावर व नडगीवर मारून जखमी केले. मांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या विजय काटकर यालाही डाव्या हातावर मार लागून दुखापत झाली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​