Uncategorized

Kolhapur SP | मोठी बातमी : आता नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक

                                  नीलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक

कोल्हापूर -राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना पदोन्नती देत गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक पदावर नियुक्त केले आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

गृह विभागाने सोमवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. या निर्णयामुळे प. महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेत नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नूतन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी
यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व संवेदनशील जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावली आहे. नक्षलविरोधी मोहिमा, दुर्गम भागातील पोलीस यंत्रणा मजबूत करणे आणि स्थानिकांशी समन्वय राखणे याबाबत त्यांना विशेष अनुभव आहे.

आता कोल्हापूरसारख्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, योगेश गुप्ता यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना डीआयजी पदावर बढती दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात व्यापक बदल
या फेरबदलांत सांगली व सातारा जिल्ह्यांमध्येही महत्त्वाचे बदल केलेआहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी झाली आहे. पुणे येथील पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून झाली आहे. हे आदेश सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी निर्गमित केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

बदल्यांचे ठिकाण
नीलोत्पल : गडचिरोली ते कोल्हापूर
योगेश गुप्ता : कोल्हापूर ते गडचिरोली
तुषार दोशी : सातारा ते सांगली
निखिल पिंगळे : पुणे ते सातारा


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​