Uncategorized

साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ची महाविजेती

कोकणचे नाव केले उज्वल : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चे विजेतेपद पटकावले आहे. तालुका, जिल्ह्यासह कोकणचे नाव उज्वल केले आहे. १९ एप्रिल रोजी उत्साहात पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये तिने दमदार कामगिरी करत महाट्रॉफीवर नाव कोरले. जानेवारी २०२६ मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या सिझनने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनेता रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखालील या पर्वाला मोठी लोकप्रियता लाभली. विशेषतः ‘भाऊचा धक्का’ या भागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन यांचा समावेश होता. तन्वीला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यामुळे ती थेट अंतिम फेरीत पोहोचली होती. १०० दिवसांच्या या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी विविध टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. शेवटच्या टप्प्यात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे तन्वीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अभिनेता राकेश बापट याने उपविजेतेपद मिळवले.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​