Uncategorized

होर्मुझची सामुद्रधुनी चीनसाठी मुक्त

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणा

वृत्तसंस्था / वॉश्ग्टिन डीसी

होमुर्झची सामुद्रधुनी आता पूर्णत: मुक्त करण्यात आली असून ती चीनसाठीही मुक्त आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ही सामुद्रधुनी अमेरिकेच्या नौदलाने चार दिवसांपूर्वी अडविली होती. जे देश इराणला शस्त्रास्त्रांचे साहाय्य करतात त्यांच्यासाठी ही सामुद्रधुनी मुक्त राहणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली होती. तथापि, आता चीनने इराणला शस्त्रपुरवठा केला जाणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे चीनसाठीही ती मुक्त करण्यात आलेली आहे. आता यापुढे ती कधीही आणि कोणीही अडवू शकणार नाही. अमेरिकेने साऱ्या जगासाठी हे काम केले आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या शनिवारी चर्चा झाली होती. तथापि, ती अपयशी ठरली होती. ही चर्चा होत असतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेचे नौदल या सामुद्रधुनीत आणून ती पूर्णत: अडविली होती. इराणच्या कोणत्याही बंदराकडे जाणारी आणि इराणच्या कोणत्याही बंदरातून निघालेली कोणतीही नौका या सामुद्रधुनीतून प्रवास करु शकणार नाही, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे इराणहून चीनला होणारा तेलाचा पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. चीनच्या दोन तेलवाहू नौकांना यु टर्न घेऊन परत फिरावे लागले होते. चीनने इराणला शस्त्रपुरवठा केल्यास चीनवर 50 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. पण आता त्यांनीच ही सामुद्रधुनी चीनसाठीही मुक्त करण्याची घोषणा केल्याने चीनला दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात मागच्या दरवाजाने काही चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असावा, अशीही चर्चा जागतिक वर्तुळात केली जात आहे.

भारतावर परिणाम काय…

अमेरिकेने ही सामुद्रधुनी बंद केली होती, तेव्हाही भारतावर वेशेष परिणाम झाला नव्हता. कारण भारताने इराणला शस्त्रपुरवठा केला नसल्यामुळे ही सामुद्रधुनी भारतासाठी मोकळी होती. तथापि, आता ती पूर्ण मोकळी केल्याची घोषणा ट्रम्प यांनी केल्याने भारताचीही अधिक सोय होणार आहे. आता भारताला आपल्या तेलवाहक आणि वायूवाहक नौका तेथून आणण्यासाठी इराण किंवा अमेरिका यांच्यापैकी कोणाचीही अनुमती घ्यावी लागणार नाही. त्यामुळे भारताचा तेलपुरवठा आणि वायूपुरवठा अधिक सुरळीत होईल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​