Uncategorized

हॅले टेनिस स्पर्धेत फ्रान्सेस टायफो विजेता

वृत्तसंस्था, हॅले

एटीपी टूरवरील येथे झालेल्या हॅले ओपन 500 ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने एकेरीचे जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या टेलर फ्रित्झचा पराभव केला.

या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात टायफोने फ्रित्झचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडला. एटीपी टूरवरील ही स्पर्धा जिंकणारा 1993 नंतर टायफो हा पहिला अमेरिकन टेनिसपटू ठरला आहे. या सामन्यात टायफोने बेसलाईन खेळावर अधिक भर देत फ्रित्झचे आव्हान संपुष्टात आणले. गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत फ्रित्झने टायफोला चौथ्या फेरीत पराभूत केले होते. हॅले स्पर्धा जिंकल्याने आता एटीपीच्या ताज्या मानांकनात टायफो 19 व्या स्थानावर आहे. आता तो विम्बल्डन स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​