Uncategorized

जियो प्लॅटफॉर्म ठरणार सर्वात मोठा आयपीओ

वृत्तसंस्था मुंबई

यावर्षी रिलायन्सचा जियो प्लॅटफॉर्मचा आयपीओ शेअरबाजारात उतरणार आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत याबाबत स्पष्टीकरण कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिले होते. जियोचा हा आयपीओ हा सर्वात मोठ्या मूल्याचा ठरु शकतो, असे म्हटले जात आहे.

कंपनीचे मूल्य जवळपास 9.5 लाख कोटी रुपये इतके आहे. या कंपनीत गुंतवणूक केलेल्या मेटा व गूगल सारख्या मोठ्या कंपन्यांना या आयपीओचा मोठा फायदा होऊ शकतो. ही गुंतवणूक कंपन्यांनी 2020 मध्ये जियोमध्ये केली होती. जियोच्या आयपीओत पूर्णपणे ताजे समभाग सादर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. समभागांची विक्री ऑफर फॉर सेल अंतर्गत होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 13 गुंतवणूकदारांकडून उभारले 1.5 लाख कोटी

मेटाच्या सहकारी कंपनीची जियोत 9.98 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. तर गुगल इंटरनॅशनल एलएलसीची 7.73 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांचे एक एक संचालक नेमण्याचा अधिकार आहे, पण अद्यापही दोघांचे संचालक कंपनीच्या संचालक मंडळात नाहीत. जियो प्लॅटफॉर्मने 2020 मध्ये जवळपास 13 गुंतवणूकदारांकडून 1.5 लाख कोटी रुपयांची उभारणी केली होती. यात वरील दोन कंपन्यांव्यतिरीक्त पब्लिक इन्वेस्टमेंट फंड, जनरल अटलांटीक सिंगापूर जेपी व इतरांचा समावेश आहे.

आठवड्यात 4 आयपीओ येणार

या आठवड्यात पाहता चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. यामध्ये टर्टलमिंट फिनटेक सोल्युशन्स, वॉटरवेज लेजर टुरिझम, अद्वैत ज्वेल्स व सीएसएम टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. सर्व कंपन्यांचा एकंदर 1779 कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. याचदरम्यान जुलै महिन्यात एसबीआय म्युच्युअल फंड व मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस यांचा आयपीओ सादर होणार आहे. त्यावरही गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​