Uncategorized

सिक्कीम पूर्व भारतातील नंदनवन! – Tarun Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : 50 व्या स्थापनादिनी 4000 कोटीची भेट

वृत्तसंस्था/ गंगटोक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीममध्ये 4 हजार कोटीहून अधिक मूल्याच्या विकासप्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. यावेळी मोदींनी सिक्कीमला पूर्व भारतातील नंदनवन ठरवत निसर्गप्रेमी पर्यटकांना राज्याच्या ऑर्किडेरियमचे भ्रमण करण्याचा आग्रह केला आहे. सिक्कीम एक भारत श्रेष्ठ भारताचे सशक्त प्रतीक असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी मंगळवारी काढले आहेत.

सिक्कीममधील स्वच्छ रस्ते आणि शुद्ध हवा येथील लोक निसर्ग संरक्षणात अग्रणी भूमिका पार पाडत असल्याचा पुरावा आहे. पर्यटन राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि सरकारचे मुख्य लक्ष येथील संपर्कव्यवस्था आणि पायाभूत सुविधांना मजबूत करण्यावर असल्याचे मोदींनी सांगितले.““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““

मुलांसोबत फुटबॉलचा आनंद

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सकाळी युवांमध्ये जात त्यांच्यासोबत फुटबॉल खेळत वातावरणात उत्साह निर्माण केला. सिक्कीम दौऱ्यातील या खास क्षणांना पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केले. गंगटोकमधील सकाळी युवांसोबत फुटबॉल खेळणे माझ्यासाठी एक अत्यंत ऊर्जादायक अनुभव राहिला. युवांसोबत खेळताना मला नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेची जाणीव झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.

व्हिडिओ केला शेअर

पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यात ते मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसून येतात. तसेच पंतप्रधान मोदी हे गाले करताना यात दिसून आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुलांसोबत वॉर्मअप सेशनमध्ये भाग घेतला होता.

राज्याला 50 वर्षे पूर्ण

सिक्कीमच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात भव्य सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून यात पंतप्रधान मोदी सामील झाले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी राज्यात सुमारे 4000 कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांचा शुभारंभ केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​