ड्रग्जच्या नशेत झिंगलेली तरुणाई !

राज्य पोलीस दलाची धुरा वाहणारे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी राज्यातून अमली पदार्थाचा नायनाट करण्यासाठी राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची नव्याने बांधणी करावी. त्यांना अतिरिक्त अधिकार प्रदान करावेत. जेणेकऊन केवळ मुंबई, पुणे किंवा शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागात देखील अमली पदार्थांसह नशेत झिंगणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करुन त्यांना योग्य ती समज द्यावी.
बड्या बापाच्या नवाबजाद्यांच्या पार्ट्या म्हटले की आपसुकच यामध्ये अमली पदार्थाचा सहभाग आलाच. तसेच शहरात होणारे तथाकथीत म्युझिक कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्जच्या सेवनाने झिंग होत असलेली तरूणाई सध्या पाहायला मिळत आहे. हे केवळ आताच पाहायला मिळत आहे असे नाही. तर यापूर्वी देखील म्युझिक कॉन्सर्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर संगीत रजनी कार्यक्रमात नशेत धुंद होत थिरकलेली तरूणाई सर्वाना माहीत आहे. मात्र जोपर्यंत यामध्ये कोणता अपघात होत नाही तोपर्यंत अशा संगीत रजनी कार्यक्रमात झिंग झालेल्या तरूणाईवर किंवा ड्रग्जचा सप्लाय करणाऱ्यावर प्रश्नचिन्ह उद्भवत नाही. तसाच प्रकार सध्या गोरेगागावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीत रजनी म्युझिक कार्यक्रमात घडला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने बिस्मात सिंह मसीन आणि श्रेया राय या दोन विद्यार्थ्यांचा मफत्यू झाला. यामुळे अचानक संगीत रजनी कार्यक्रम आणि अशा कार्यक्रमात विकले जाणारे ड्रग्ज प्रकाशझोतात आले. याप्रकरणी आत्तापर्यंत 11 जणाना अटक करण्यात आली असली तरी याचा मास्टरमाईंड देशातून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पार्ट्या आणि अशा कार्यक्रमात ड्रग्ज सेवन करणे म्हणजे एक स्टेटस
सिम्बॉल समजले जाते. बड्या थेरांची लेकरे तर या पार्ट्या आयोजीत करण्यात पुढाकार घेत असतात. याला रेव्ह पार्ट्या देखील समजले जाते. अशीच राज्यातील पहिली रेव्ह पार्टी 4 मार्च 2007 साली पुणे जिह्याच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात आयोजीत करण्यात आली होती. 287 हून अधिकजण या पार्टीत सहभागी झाले होते. आयटी प्रोफेशनसह बड्या बापाच्या बिघडलेल्या अवलादी या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. पोलीस अधिक्षकपदी असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी या ठिकाणी छापा टाकला आणि पार्टी उधळून लावत या सर्वाना ताब्यात घेतले. हे प्रकरण एवढे गाजले की तत्कालीन सरकारमधील अनेक मंत्री आणि राजकीय नेत्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्यास सुऊवात केली होती. म्हणजे या पार्टीची तीव्रता आणि यामध्ये अडकलेल्यांची पोहच कुठपर्यंत होती हे त्यावेळी आढळून आले होते.
मोठ्या पार्टी किंवा शहरात होणारे म्युझिक कॉन्सर्ट सारखे कार्यक्रम ड्रग्ज तस्करांच्या निशाण्यावर असतात. त्यानुसार ते याठिकाणी आयोजक किंवा सुरक्षा रक्षकांना हाताशी घेत तरूणाईपर्यंत ड्रग्ज पोहचविण्यास सुऊवात करतात. समोर म्युझिक आणि लाईटचा शो तर या शो आणि ड्रग्जच्या नशेवर थिरकरण्यास सुऊवात करणाऱ्या या तरूणाईला आपण किती प्रमाणात ड्रग्ज सेवन करतोय किंवा हे ड्रग्ज कोणते आहे? याची सुतराम कल्पना नसते. यातच ओव्हर डोस होऊन या तरूणाईचा अंत होत आहे. तोच प्रकार गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झाला. नशा येणाऱ्या ‘एक्स्टसी’ या गोळ्यांचा ओव्हर डोस झाल्याने या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला. वनराई पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या ‘नेस्को सेंटर’ मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. कोणत्याही कॉन्सर्टला परवानगी देताना पोलीस अटी आणि शर्ती घालतात, परंतु अलीकडे त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. म्युझिक कॉन्सर्टची महागडी तिकिटे सामान्यांना परवडणारी नसतात. बहुसंख्य श्रीमंत बापांची वाया गेलेली, लाड केलेले दिवटे कॉन्सर्टमध्ये धांगडधिंगा घालताना दिसतात. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये नेस्को इन्स्पायरिंग हाय प्रोडक्शन यांच्या वतीने लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. एका सुरक्षा रक्षकाने एका नशेबाज टोळक्याला पैसे घेऊन विनातिकीट कार्यक्रमात प्रवेश दिला. त्याच टोळक्याने संगीत रजनी कार्यक्रमात भाग घेतलेल्या तऊण-तऊणींना ‘एक्स्टसी’ या गोळ्यांचा दामदुप्पट पैसे घेऊन पुरवठा केला. त्यात बिस्मात या तऊणाचा तर श्रेया या तऊणीचा अतिसेवनाने मफत्यू झाला. सदोष मनुष्य वध आणि अंमली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एका आयोजकाला आणि ड्रगचा पुरवठा करणाऱ्या अशा 11 जणांना वनराई पोलिसांनी अटक केली आहे.
एलएसडी, कोकेन, एमडी या अंमली पदार्थाप्रमाणे एक्स्टसी ही गोळीही महाग आहे. एका गोळीची अंदाजे 1500 ऊपये किंमत असल्याचे सांगण्यात येते. ही गोळी घेतल्यानंतर अचानक संवेदना तीव्र होतात, अशावेळी अश्लील चाळे केले जातात. त्यातून बऱ्याचदा विपरीत घडते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गुन्हे दाखल होतात. हिंदू संस्कृतीवर घाला घालणारे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अशा म्युझिक कॉन्सर्टसारख्या कार्यक्रमांना परवानगी देताना राज्य सरकारने कठोर नियम, अटी शर्ती घातल्या पाहिजेत. तरच गोरेगावसारखे मफत्युकांड थांबेल, नाही तर मुंबईसह महाराष्ट्राची अवस्था उडता पंजाबप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही.
मुंबईतील जुहू, वांद्रे, अंधेरी, खार आदी उच्चभ्रु वस्तींमध्ये कोकेन, हेरॉईन, एलएसडी एमडीएमए यासारख्या ड्रगची विक्री केली जाते. गांजा, भांग, अफीम, चरस, ब्राऊन शुगर, एमडीसारख्या अत्यंत जहरी अमली पदार्थांनी तर मुंबईसह सारा देश पोखरला असून मुंबईतील रे रोड, मस्जिद बंदर, वरळी, सॅण्डहर्स्ट रोड, डोंगरी, माहीम, कुर्ला, गोवंडी, धारावी, मानखुर्द, अंधेरी, जुहू, शीव, पवई, मोहम्मद अली रोड, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, नवी मुंबईतील खारघर, ठाणे, कल्याण, मुंब्रा आदी परिसरात ड्रग्ज माफियांनी आपले जाळे पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंदसोर, हिमाचल प्रदेश जम्मू-कश्मीर, नेपाळ, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी भागांतून मुंबईसह देशभरात ब्राऊन शुगर, हेरॉइन, गांजा आदी अमली पदार्थांचा पुरवठा ट्रक, ट्रेन, खासगी प्रवासी बसेस आदी वाहनांतून केला जातो. महाराष्ट्राच्या गडचिरोली, यवतमाळ, धुळे, धाराशीव आदी जिह्यांतूनही गांजाचे उत्पादन करून त्याचा पुरवठा मुंबईसह देशभरात केला जातो. पालघर, बोईसर, रायगड, महाड आदी औद्योगिक वसाहतींमध्ये दिवाळखोरीत निघालेल्या कारखान्यांत अमली पदार्थांवर प्रक्रिया केली जाते. भाड्याने घेतलेल्या छोट्या छोट्या गाळ्यांमध्येही एमडी सारखे ड्रग्जचे उत्पादन केले जाते.
ग्रामीण भागात तस्करानी ड्रग्जचे कारखाने उभे केले आहेत. यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत या कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. देशातील शहरी भागातील बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांचे बळी ठरत आहेत. त्यात आता मुलींचीही संख्या वाढू लागली आहे. जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे विद्यार्थी आज आपणास व्यसनाधीन झालेले आढळून येत आहेत. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान आदी देशांतून आपल्या देशात अमली पदार्थ येतात.
Source link



