माजगाव थेट सरपंच पदासाठी अवघे ४०.११ टक्के मतदान

कमी मतदानामुळे काटे की टक्कर
; उद्या सकाळी १० वाजता निकाल
ओटवणे : प्रतिनिधी
मंगळवारी झालेल्या माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी अवघे ४०.११ टक्के मतदान झाले. एकूण ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७८२ महिला मतदारानी तर ८९७ पुरुष मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक २ मध्ये १००१/५११, प्रभाग क्रमांक २ मध्ये ७३८/३५०, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ८७०/१९३, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ८३१/३१३, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७४५/३१२ मतदान झाले.कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार आणि कोण बाजी मारतो हे बुधवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयात मतमोजणीच्या निकालात स्पष्ट होणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात निकाल लागणार आहे. कमी मतदानामध्ये ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित आहे. माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची ही निवडणूक महायुती विरुद्ध अपक्ष अशी दुरंगी झाल्याने दोन्ही बाजूने विजयाचा दावा करण्यात आला आहे.भाजपा महायुती पुरस्कृत रंजना रवींद्र कानसे विरुद्ध अपक्ष जयश्री दिनेश सावंत अशी थेट निवडणूक होत आहे. या दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी विस्ताराने मोठा असलेला हा गाव पिंजून काढीत गेले आठ दिवस जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी यशवंत परब काम पाहत आहेत.
Source link



