संस्थानकालीन मोती तलावाचा होणार कायापालट

प्रकल्पाचा प्रारूप आराखडा तयार ; मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : प्रतिनिधी
संस्थानकालीन सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावाचा जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटन विकासात्मक प्रकल्प राबविण्यात येणार आहे . या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या संदर्भात मुंबई मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली . या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला तत्त्वतः संमती देण्यात आली आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी सावंतवाडी मोती तलावाचे सौंदर्यीकरण आणि विकासात्मक प्रकल्प राबवण्यासंदर्भात आराखडा तयार केला होता.या बैठकीला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर ,सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम सावंत भोसले, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले , विकासात्मक प्रकल्प आराखडा तयार करणारे आर्किटेक व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी मोती तलावात एक विकासात्मक जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवण्यासंदर्भात तयार करण्यात आलेला आराखडा हा योग्य असून यानुसार लवकरच आपण या प्रकल्पाच्या बाबतीत सकारात्मक पावले उचलू असेही स्पष्ट केले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनीही सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादित केले .
Source link



