विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यामुळे दुर्बळ

► वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम
विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाला तोंड द्यावे लागलेल्या विरोधकांनी आता पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी पुन्हा एकदा विरोधी ऐक्य डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यापूर्वी गांधी यांनीही विजयन यांच्यावर आगपाखड केली होती. राहुल गांधी विरोधी पक्षनेत्यांवरच तोंडसुख घेऊन विरोधी ऐक्य दुर्बळ करीत आहेत, असा प्रहार विजयन यांनी शनिवारी येथे केला आहे.
मला विरोधकांचे ऐक्य हवे आहे. मात्र, मी विजयन यांना भेटणार नाही. कारण केरळमध्ये आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहोत, असे विधान राहुल गांधी यांनी तीन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष संतप्त झालेला आहे. भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम करण्याचे काम राहुल गांधी अशी विधाने करुन करीत आहेत, असाही टोला विजयन यांनी लगावला.
Source link



