कॉक्रोच जनता पार्टीचे अमृतसरमध्ये आंदोलन

अभिजीत दीपके यांचाही सहभाग
► वृत्तसंस्था/ अमृतसर
कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने शनिवारी अमृतसरमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनापूर्वी पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके दुपारी सुवर्ण मंदिरात पोहोचले. त्यानंतर गोल्डन गेटकडे जात त्यांनी आंदोलनासाठी जमलेल्या गर्दीत सहभाग घेतला. ते आंदोलनस्थळी हजर होताच गोल्डन गेटवर तरुणांचा मेळावा सुरू झाला. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी येथील शांततापूर्ण आंदोलन पुणे आणि दिल्लीतील आंदोलनांपेक्षा मोठे असेल असा आशावाद व्यक्त केला. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि नीट व सीबीएसई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करणे हे त्याचे उद्दिष्ट असल्याचेही सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आणि त्यांनी आवाज उठवला, तर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात सकारात्मक परिणाम साधता येतील, असेही ते म्हणाले.
Source link



