Uncategorized

अयोध्या राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी एसआयटी

आयुक्त-आयजी यांनी घेतला तपासाचा ताबा ; 15 दिवसांत अहवाल येणार

वृत्तसंस्था/ अयोध्या, लखनौ

अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीच्या कथित चोरीप्रकरणी कारवाई तीव्र झाली आहे. विशेष कृती गटाने एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आता मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

श्री रामजन्मभूमी मंदिरातील दानपेट्यांमधून देणगी चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केलेल्या एसआयटी चौकशीच्या विनंतीला सरकारने तात्काळ मंजुरी दिली आहे. या संवेदनशील प्रकरणाची पारदर्शक आणि जलद चौकशी करण्यासाठी सरकारने एक अत्यंत शक्तिशाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हे विशेष पथक केवळ अफवांमागील वस्तुस्थितीच उघड करण्यासोबतच या प्रचारामागे असलेल्यांनाही उघडकीस आणेल, असे सांगण्यात आले.

एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकारी

उत्तर प्रदेश सरकारने या तपासाची जबाबदारी राज्यातील सर्वात अनुभवी आणि कडक अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. एसआयटीमध्ये सध्या लखनौचे विभागीय आयुक्त असलेले विजय विश्वास पंत यांचा समावेश असून ते संपूर्ण तपास समितीचे अध्यक्षपद भूषवतील. तसेच पोलीस महानिरीक्षक किरण एस. (आयपीएस) आणि नील रतन (विशेष सचिव, वित्त) यांचाही तपास अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार, या उच्चस्तरीय समितीला आपला तपास अतिवेगवान गतीने पूर्ण करावा लागेल. एसआयटीला आपले काम पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी पंधरवड्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

देणग्या मोजणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घरातून 12 लाख रुपये जप्त

राम मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरीच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दानपेटीतील निधीच्या कथित अपहार प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. रुदौली भागातील मीनापूर ठाकुरान फागौली गावात टाकलेल्या छाप्यात तपास यंत्रणांनी आरोपी लवकुश मिश्राच्या घरातून अंदाजे 10 ते 12 लाख रुपये जप्त केले. ही कारवाई राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली. 27 वर्षीय मिश्रा हा राम मंदिरात कर्मचारी होता. मिश्रा देणग्यांच्या अपहारात सामील असल्याचा आरोप आहे. तपास पथकाने धाडीदरम्यान जप्त केलेली रक्कम ताब्यात घेतली.

लवकुश मिश्रा पूर्वी कार मेकॅनिक म्हणून काम करत होता. वर्षभरापूर्वी त्याला राम मंदिर ट्रस्टमध्ये नोकरी मिळाली. येथे नोकरी मिळाल्यानंतर लगेचच त्याच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल झाला. स्थानिकांच्या मते, लवकुश गावात यायचा तेव्हा तो भरमसाट खर्च करायचा. त्याने एकदा दारूच्या कंत्राटावर जवळपास 50,000 रुपये खर्च केले होते, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. तथापि, या दाव्यांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​