Uncategorized

मुंबई इंडियन्सला विजय गवसला

लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय :  सामनावीर रिकल्टन, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी  

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबईचा राजा रोहित शर्मा संघात परतला अन् मुंबई इंडियन्सने लखनौविरूद्ध वानखेडेवरील सामना जिंकला. सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईने लखनौचा 6 विकेट्सनी पराभव केला. लखनौने मुंबईला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते आणि मुंबईने हे टार्गेट सहा विकेट्स आणि 8 चेंडू राखून पूर्ण केले. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचे 229 धावा हे आयपीएल इतिहासातील यशस्वीपणे गाठलेले सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे. दुसरीकडे, दुखापतीतून सावरल्यानंतर रोहित शर्माने धमाकेदार खेळी साकारली खरी पण तो शतकापासून वंचित राहिला.

लखनौने विजयासाठी दिलेल्या 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात दणक्यात झाली. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या जोडीने पहिल्या विकेटसाठी 65 चेंडूत 143 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीने मुंबईच्या विजयाचा पाया रचला गेला. रिकेल्टन 32 चेंडूत 6 चौकार व 8 षटकारांसह 83 धावा करत बाद झाला. तर रोहित शर्माने 44 चेंडूत 6 चौकार व 7 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर तिलक वर्मा 11 तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 12 धावांचे योगदान दिले. यानंतर नमन धीरने पुन्हा एकदा संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. नमनने 12 चेंडूत 3 चौकार व एका षटकारासह नाबाद 23 धावांची खेळी केली. तर विल जॅक्सने 4 चेंडूत नाबाद 10 धावांची खेळी करत मुंबईला 18.4 षटकांत विजय मिळवून दिला.

लखनौचे पॅकअप

प्रारंभी, मुंबई नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. लखनौची सुरुवात अगदी दणक्यात झाली, पण जोश इंग्लिस 13 धावा करत गझनफरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मिचेल मार्श व निकोलस पूरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 चेंडूत 94 धावा केल्या. मार्शने 25 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 44 धावांची खेळी केली. तर पूरन आपल्या आक्रमक अंदाजात परतला आणि यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. पूरनने या सामन्यात 21 चेंडूत 1 चौकार व 8 षटकारांसह 63 धावांची वादळी खेळी केली. कार्बिन बॉशने एकाच षटकात मार्श व पूरनला झेलबाद करत संघाला विकेट्स मिळवून दिल्या. यानंतर ऋषभ पंत 15 धावा, रघुवंशी 11 धावांचे योगदान दिले. एडन मार्करमने 25 चेंडूत 31 धावा तर हिम्मत सिंगने नाबाद 40 धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर लखनौने 20 षटकांत 228 धावा केल्या. दरम्यान, दोनशेचा टप्पा गाठूनही लखनौला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पराभवासह त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 5 बाद 228 (मिचेल मार्श 44, जोस इंग्लिश 13, निकोलस पूरन 21 चेंडूत 1 चौकार, 8 षटकारांसह 63, ऋषभ पंत 15, मार्करम 25 चेंडूत नाबाद 31, रघुवंशी 11, हिम्मत सिंग 31 चेंडूत नाबाद 40, कॉर्बिन बॉश 2 बळी, गझनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा प्रत्येकी 1 बळी)

मुंबई इंडियन्स 19 (रिकेल्टन 32 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारासह 83, रोहित शर्मा 44 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारासह 84, तिलक वर्मा 11, सूर्यकुमार यादव 12, नमन धीर नाबाद 23, विल जॅक्स नाबाद 10, सिद्धार्थ 2 बळी, मोहम्मद शमी आणि मोहसीन खान प्रत्येकी 1 बळी).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​