Uncategorized

माडखोलचे निवृत्त हवालदार महादेव नाईक यांचे निधन; सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार

ओटवणे : प्रतिनिधी : माडखोल ठाकूरवाडी येथील भारतीय सैन्य दलातील निवृत्त हवालदार हादेव नारायण नाईक (91) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भारतीय सैन्य दलाच्या नियम व ड्रिलनुसार शोकवंदना देत सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हवालदार महादेव नाईक हे 5 डिसेंबर 1958 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल 15 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सन 1973मध्ये हवालदार पदावरून ते निवृत्त झाले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला व ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सकाळी भारतीय सैन्य दलाच्या नियम व ड्रिलनुसार पुष्पचक्र अर्पण करून शोकवंदनेसह मानवंदना देण्यात आली.

हवालदार महादेव नाईक यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, भाऊ, भावजय, जावई, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी बसस्थानक येथील रिक्षाचालक प्रकाश नाईक यांचे ते वडील, तर माडखोल फुगी नजीक भगवती प्रसाद सभागृहाचे मालक दीपक नाईक यांचे ते काका होत.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​