दोडामार्गात शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची संकल्पना
सावंतवाडी । प्रतिनिधी
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक 24 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग प्रांगणात संपन्न झाले. या शिबिरामध्ये शाळेमध्ये शिकत असलेले व तालुक्यातील इतर विद्यार्थी असे एकूण 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना लाठीकाठी, तलवारबाजी व आत्मसंरक्षण याचे परिपूर्ण असे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, दोडामार्ग मधील सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गावडे सर, पालक श्री. गणेश ठाकूर व श्री सोमनाथ नाईक, श्री धाकू वरक, मुख्याध्यापक श्री संजय पाटील यांच्याकडून पूरक आहारही देण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पालक श्री सोमनाथ नाईक यांनी प्रशिक्षकांचे शाल श्रीफळ व पेन देऊन आभार मानले. या प्रशिक्षणासाठीचा सर्व आर्थिक भार संस्थेचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांनी उचलला होता.
Source link


