Uncategorized

मळगाव घाटीत कार कोसळून अपघात

सावंतवाडी प्रतिनिधी

मळगाव घाटीत स्पोर्ट कार आणि मारुती इको यांच्यात अपघात होऊन मारुती इको कार सुमारे 20 फूट खाली कोसळून गाडीचा चक्काचूर झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.गाडीतील रजत मंगेश शिरसाट ( 68 ), श्रीधर रंजन शिरसाठ (30) जयश्री विश्वनाथ शिरसाठ (65 ) हर्ष महेश शिरसाठ (18 ) उमा मंगेश शिरसाठ (56)  मंगेश महेश शिरसाठ (60 ) रंजन शिरसाट (63) राहणार सालईवाडा सावंतवाडी हे  7 प्रवासी बचावले असून त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. घटनास्थळी गाडी कोसळल्यानंतर गांधींल माशांनी बचाव करणाऱ्यांवर हल्ला केला .अर्जुन भरत पानवलकर हे स्पोर्ट गाडी घेऊन मळगावच्या दिशेने जात होते. तर इको गाडी सावंतवाडीच्या दिशेने येत होती. त्यावेळी अपघात होऊन इको कार मळगाव घाटीत पलटी झाली. तर स्पोर्ट गाडीतील चालकासह दोन्ही प्रवासी बचावले. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस करत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​