Uncategorized

पंतप्रधानांकडून विशेषाधिकारांचा भंग

काँग्रेस नेते वेणुगोपालांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विशेषाधिकार भंगाच्या नोटीससाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी 18 एप्रिल रोजी राष्ट्राच्या नावाने स्वत:च्या संबोधनात लोकसभेच्या सदस्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यांच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी स्वत:च्या पत्रात केला आहे. पंतप्रधानांचे हे कृत्य संसदेची प्रतिष्ठा आणि खासदारांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारे असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

लोकसभेत घटना (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 संमत झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले होते. स्वत:च्या भाषणात पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या खासदारांचे मतदान आणि त्यांच्या हेतूवरून थेट स्वरुपात टिप्पणी केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांनी या पूर्ण प्रकरणाला अत्यंत गंभीर ठरविले आहे. हा केवळ कुठल्याही व्यक्तीवरील हल्ला नसून संसद आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित मुद्दा आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे केली आहे.

खासदारांच्या अधिकारांचे रक्षण अन् संसदेची प्रतिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशाप्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधानांचे हे संबोधन पूर्वीपासून निश्चित परंपरांच्या विरोधात होते आणि यात विरोधी पक्षांवर अनेक राजकीय हल्ले करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​