Uncategorized

संयुक्त अरब अमिरात ओपेकमधून बाहेर

धोरणात्मक निर्णयाची केली घोषणा, गटाला धक्का

वृत्तसंस्था / दुबई

संयुक्त अरब अमिरातीने तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून अमिरात या गटाची सदस्य असणार नाही, असे घोषित करण्यात आले. तसेच ‘ओपेक प्लस’मधूनही आपण बाहेर पडत आहोत, असे या देशसमूहाने स्पष्ट केल्याने या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला.

मध्यपूर्वेत सध्या होत असलेल्या अमेरिका. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे कार्यान्वयन 1 मे 2026 पासून होणार आहे. अमिरातीचे दीर्घकालीन हित आणि जागतिक परिस्थिती यांची सांगड घालून हा निर्णय घेण्यात आला असून तो लवकरच लागू केला जाईल, असे अमिरातीच्या वक्तव्यात स्पष्ट केले गेले आहे. ओपेकच्या प्रारंभापासून संयुक्त अरब अमिरात त्याचा सदस्य होती.

अमिरातीचे वक्तव्य

आम्ही या गटात प्रारंभापासून होतो. या गटाच्या प्रगतीसाठी आणि गटाच्या संवर्धनासाठी आम्ही आमच्या सदस्यताकाळात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. कित्येकदा या गटाच्या आणि जगाच्या हितासाठी आम्ही मोठा त्यागही केला आहे. तथापि, सध्याची परिस्थिती सदस्यता पुढे राखण्यासाठी अनुकूल नाही. आता आम्हाला आमच्या समूहाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्ररित्या निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तिला अनुसरुन आम्ही हा निर्णय घेतला, असे या समूहाने स्पष्ट केले. हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जगभरात उमटू लागली आहे.

परिणाम काय होणार…

या घोषणेनतंर ओपेक गटात हालचालींना प्रारंभ झाला आहे. संयुक्त अरब अमिरात हा मूल्यवान सदस्य होता. हे देशसमूह आर्थिकदृष्ट्या आणि ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध होता. त्याने या गटाचे सदस्यत्व सोडल्याने आता आणखी काही देशही तसा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओपेकचे बळ आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव दुर्बल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना अमिरातीने सौदी अरेबियासह गटातील अन्य कोणत्याही देशाशी विचारविमर्श केलेला नाही. ओपेकमधील सर्वात मोठा सदस्य देश सौदी अरेबिया हा आहे.

उत्पादनात घट

मध्यपूर्वेतील युद्धामुळे ओपेक देशांचे तेल आणि इंधन वायू उत्पादन घटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढूनही त्याचा लाभ ओपेक देशांना मिळत नाही. त्यामुळे गटाची आर्थिक स्थिती खालावल्याचे दिसून येते. त्यातच आता संयुक्त अरब अमिरातीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने स्थिती अधिक बिकट होऊ शकते. ओपेक गट विस्कटू शकतो, अशी प्रतिक्रिया काही देशांनी व्यक्त केली.

अमेरिकेचा इशारा

ओपेक गटाने आतापर्यंत तेलाचे दर चढे ठेवून जगाचे शोषण केले आहे, अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. तसेच या गटाला अमेरिकेचे समर्थन मिळते, ते तेलदरांवर अवलंबून आहे, असा इशाराही ट्रंप यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकेची नाराजी या गटावर झाल्याचा अर्थ काढला जातो. ट्रंप यांचे हे विधानही संयुक्त अरब अमिरातीने हा निर्णय घेण्यासाठी कारणीभूत असू शकते, अशी प्रतिक्रिया अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केली.

अमिरातीचा निर्णय परिवर्तन घडविणारा

ड अमिरातीच्या ओपेक सोडण्याच्या निर्णयामुळे तेल समीकरणे विस्कटणार

ड ओपेकच्या भल्यासाठी कार्य आणि त्याग केल्याचे अमिरातीचे प्रतिपादन

ड अमिरातीप्रमाणे या गटातील इतर काही देशही संघटनेबाहेर पडणे शक्य

ड आपल्या समूहाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे अमिरातीचे स्पष्टीकरण


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​