टेक महिंद्राने कमावला 1354 कोटीचा नफा

नवी दिल्ली :
टेक महिंद्रा कंपनीचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतला नफा 16 टक्के वाढीसोबत 1354 कोटी रुपयांवर पोहचला आहे. एक वर्षापूर्वी याच अवधीत कंपनीने 1167 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बुधवारी उशीरा कंपनीने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली. याचदरम्यान कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 36 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणादेखील केली आहे. निकालानंतर टेक महिंद्राचा समभाग शेअरबाजारात 2.53 टक्के वाढत 1462 रुपयांवर बंद झाला. गेल्या एक वर्षात पाहता समभागाने 6 टक्के वाढ दर्शवली आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1.43 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
कंपनीने सदरच्या तिमाहीत 12 टक्के वाढीसह 15076 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 13384 कोटी रुपये महसूलापायी कमावले होते. कंपनीचे एकूण उत्पन्न वर्षाच्या आधारावर वाढत 14,871 कोटी रुपयांवर पोहचले. जे मागच्या वर्षी 13,556 कोटी रुपयांवर राहिले होते.
Source link



