जोतिबा डोंगरावर बंदी आदेश धुडकावून शस्त्रे बाळगणारे दोन तरुणांना अटक, कोडोली पोलिसांची कारवाई

वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाडी रत्नागिरी जोतीबा डोंगरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करत घातक शस्त्रास्त्रांसह दहशत माजवणाऱ्या दोन स्थानिक तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे.
कोडोली पोलिसांनी गुरुवारी दि.११ रोजी सेंट्रल प्लाझा येथे रुद्र सोमनाथ मिटके आणि विवेक राजाराम बुणे दोघे रा. वाडी रत्नागिरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वाडी रत्नागिरी परिसरात दहशत माजवण्याच्या हेतूने हे तरुण धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार भरतकुमार मोळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना ताब्यात घेतले.
आरोपीकडून एक १६ इंच लांबीचा धारदार कोयता आणि एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही तरुणांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, या घटनेचा पो. हे. काँ. ५१२ जोग या अधिक तपास करत आहेत. अशी माहिती सहा.पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी दिली.
Source link



