Charity Appeal ‘वृषभ’साठी माणुसकीच्या हातांची गरज गरीब कुटुंबातील जखमीला ६ लाखांच्या मदतीची गरज

| त. भा. वार्ताहर सावळज : नशिबाने दिलेल्या एका अनपेक्षित आणि भीषण धक्कामुळे सावळज येथील एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सावळज येथील आचारी विजय नाईक (बस्ताद) यांचा हुशार मुलगा वृषभ नाईक हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे एम.बी.बी.एस.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. भविष्यात डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वृषभचा नुकताच अपघात झाला. यात वृषभच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया केली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आर्थिक अडचणीमुळे मदतीचे आवाहन कुटुंबाने केले आहे.
खर्च आवाक्याबाहेर
वृषभच्या उपचारासाठी आतापर्यंत मोठा खर्च झाला, पुढील उपचारांचा खर्च गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर आहे. त्याला पूर्णपणे बरे करण्यासाठी अजून सहा लाख रुपयांची तातडीने गरज आहे. विजय नाईक यांनी आयुष्यभर लोकांचे कार्यक्रम गोड केले, मात्र आज त्यांच्याच कुटुंबावर कठीण प्रसंग आला आहे. एका गुणवंत डॉक्टरचे प्राण वाचवण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या आणि माणुसकीच्या हातांची गरज आहे.
वृषभच्या अपघाताची बातमी समजताच सावळज व परिसरातील अनेक माणुसकीचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. अनेकांनी स्वतःहून जमेल तशी आर्थिक मदत देऊ केली, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांचा मोठा खर्च पाहता ही मदत पुरेशी नाही. त्यामुळे ‘आपली छोटीशी मदतही वृषभला नवीन आयुष्य देऊ शकते’ ही भावना ठेवून सर्वांनी शक्य तितकी आर्थिक मदत करावी, असे नम्र आवाहन नाईक कुटुंबीय आणि मित्रांकडून करण्यात आले आहे.
मदतीचे आवाहन
गरीब, कष्टाळू बापाच्या हुशार मुलाला आणि देशाच्या भावी डॉक्टरला वाचवण्यासाठी दातृत्वाची भावनेने केलेली छोटीशी मदत आधार ठरू शकेल. त्यामुळे मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी थेट युपीआयद्वारे मदत करण्यासाठी खालील खात्यांचा वापर करावा, खातेधारकाचे नाव– ऋषिकेश विजय नाईक, युपीआय आयडी:७०५८९१४५९१-२@ybl, युपीआय क्रमांक: +९१ ७०५८९१४५९१.
Source link



