Uncategorized

चोरांनी चोरीच्या दागिन्यातून भरले कारचे हप्ते

नऊ लाखांचे दागिने, 15 हजार रुपये किमतीची चांदी जप्त : कित्तूर पोलिसांकडून दोघांना अटक

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : चोरीचे दागिने फायनान्समध्ये ठेवून कारचे हप्ते भरणाऱ्या दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 15 हजार रुपये किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून मोटारसायकल व कार जप्त करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पत्रय्या निंगय्या हिरेमठ, राहणार होळीनागलापूर, अनिलकुमार प्रभूस्वामी हिरेमठ, राहणार गुंडलूर चाळ, बैलहोंगल अशी या जोडगोळीची नावे आहेत. त्यांनी कित्तूर व बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन चोऱ्या केल्याची कबुली दिलीआहे.

तांत्रिक विभागाच्या मदतीने चोरीचा शोध

बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत एस., गंगाधर हंपण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तांत्रिक विभागाच्या मदतीने पोलिसांनी चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला आहे.

कित्तूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील अवरादी येथील रेणुका आनंद पुरद यांच्या घरी चोरी झाली होती. छतावरील कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने पळविले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना 22 जून रोजी चिक्कनंदिहळ्ळी क्रॉसजवळ मोटारसायकलवरून जाणाऱ्या पत्रय्या व अनिलकुमार यांना अडवून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली.

हप्ते भरलेली कारही जप्त

डिसेंबर 2025 मध्ये बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात संगोळ्ळी येथे एक घरफोडी करण्यात आली होती. या जोडगोळीची कसून चौकशी केली असता दोन प्रकरणात चोरलेले दागिने बैलहोंगल, कित्तूर, हुक्केरी, बेळगाव येथील वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांमध्ये ठेवून आलेल्या पैशातून कारचे हप्ते भरल्याची कबुली त्यांनी दिली. चार फायनान्समध्ये गहाण ठेवलेले 60 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. ज्या कारचे हप्ते भरले होते, ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​