आता महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला

ठाणे-भिवंडी पोलिसांकडून धाड टाकून कारवाई : आज होणारी परीक्षा लांबणीवर
त. भा. प्रतिनिधी
मुंबई, पुणे, नाशिक : नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहितीही समोर आली आहे. पेपरफुटीमुळे टीईटी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची वेळ महायुती सरकारवर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आज (रविवारी) राज्यातील 1 हजार 28 केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. पण पेपरफुटीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे.
भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयित इसमांकडे धाड टाकली होती. या कारवाईत संबंधित इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेशी संबंधित काही प्रŽ आणि माहिती आढळून आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने पडताळणीसाठी पाचारण करण्यात आले. पडताळणीदरम्यान त्या इसमांकडे असलेले काही प्रŽ मूळ प्रŽपत्रिकेतील प्रŽांशी जुळत असल्याचे दिसून आले. या धक्कादायक प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
याबाबत बोलताना परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे म्हणाल्या, या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रे निश्चित करण्यात आली होती आणि सुमारे 6 लाख 12 हजार 500 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते. नीट 2026 परीक्षेतील अलीकडील गैरप्रकार लक्षात घेता राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. प्रŽपत्रिकेची निर्मिती इन-पॅमेरा आणि अत्यंत गोपनीय प्रेसमध्ये करण्यात आली होती. तसेच या प्रŽपत्रिका राज्यभरातील टेझरीमध्ये (कोषागार) सशस्त्र पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. 28 जूनच्या सकाळी या प्रŽपत्रिकांचे केंद्रांवर वितरण होणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा पेपर लीक झाल्याचे समोर आले.
पारदर्शकतेसाठी परीक्षा स्थगित : उपायुक्त प्रिया शिंदे
परीक्षेत कोणतीही तडजोड न करता ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच व्हावी, असा परिषदेचा आग्रह आहे. सद्य:स्थितीतील गोंधळ आणि प्रŽपत्रिकेची गोपनीयता भंग पावल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलणे अनिवार्य होते. या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणाचा हात आहे आणि हा पेपर नेमका कोणत्या स्तरावर लीक झाला, याचा शोध घेतला जात असल्याचेही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार
या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला अभ्यास सुरू ठेवावा, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. नवीन प्रŽपत्रिकेची छपाई, तिचे वितरण आणि इतर प्रशासकीय बाबींसाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन परीक्षेची नवीन तारीख आज किंवा उद्याच परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून कठोर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पेपर फोडणाऱ्यांसह या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांना कारवाईचा इशारा दिला. मंत्री भुसे म्हणाले, नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेची काळजी घेण्यात आली होती. तरीही अशाप्रकारे पेपर फुटल्याने ही गंभीर बाब आहे. याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच पोलिस प्रशासनाला या पेपर फुटीचे सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
Source link



