Uncategorized

कोहलीची ‘विराट’ खेळी आरसीबीचा केकेआरवर दणकेबाज विजय

पराभवामुळे केकेआरचे प्लेऑफच्या आशेवर पाणी : अंगक्रिश रघुवंशीचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था/ रायपूर

चेस मास्टर विराट कोहलीच्या (60 चेंडूत नाबाद 105) नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने केकेआरचा 6 गडी राखून पराभव केला. रायपूरमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने 20 षटकांत 4 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 19.1 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजयी टार्गेट पूर्ण केले. या विजयासह आरसीबीने 16 गुणासह गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशा जवळपास मावळल्यात जमा आहे.

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जेकब बेथेल 15 धावा करत बाद झाला. त्यानंतर दोन वेळा शून्यावर बाद झालेल्या विराटने मात्र शानदार खेळी करत आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली. विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी 59 चेंडूत 92 धावांची खेळी करीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली. देवदत्त पडिक्कलने 27 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदार 11 धावा करत तंबूत परतला. टीम डेव्हिड फक्त 2 धावा करत माघारी परतला. दुसरीकडे, विराटने मात्र रायपूरच्या मैदानात आपला झंझावात दाखवताना 60 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारेंसह नाबाद 105 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याचे हे आयपीएलमधील नववे शतक ठरले. जितेश शर्मा 8 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने विजयी लक्ष्य 19.1 षटकांतच पार केले.

केकेआरला पराभवाचा धक्का

प्रारंभी, आरसीबीने नाणेफेक जिंकत केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि फिन अॅलन 19 आणि 18 धावा करत बाद झाले. यानंतर अंगक्रिश रघुवंशीने संघाचा डाव सावरला. रघुवंशीने 46 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांसह 71 धावांचे योगदान दिले. कॅमेरॉन ग्रीनने 24 चेंडूत 32 धावा केल्या तर रिंकू सिंगने 29 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 49 धावांची खेळी केली. या जोरावर केकेआरने 20 षटकांत 4 बाद 192 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

केकेआर 20 षटकांत 4 बाद 192 (अजिंक्य रहाणे 19, फिन अॅलन 18, रघुवंशी 71, कॅमेरॉन ग्रीन 32, रिंकू सिंग नाबाद 49, भुवनेश्वर कुमार, हेजलवूड आणि रसिख सलाम प्रत्येकी 1 बळी)

आरसीबी 19.1 षटकांत 4 बाद 194 (जेकब बेथेल 15, पडिक्कल 39, रजत पाटीदार 11, टीम डेव्हिड 2, विराट कोहली 60 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 105, जितेश शर्मा नाबाद 8, कार्तिक त्यागी 32 धावांत 3 बळी, सुनील नरेन 1 बळी).

-आठव्या विजयासह आरसीबी पुन्हा अग्रस्थानी

-कोहलीच्या जलद 14000 टी-20 धावा पूर्ण, कोहलीने 409 डावांत तर ख्रिस गेलने 423 डावांत हा टप्पा गाठला

-सामनावीर कोहलीचे नववे आयपीएल शतक.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​