Uncategorized

लेफ्टनंट जनरल राजीव घई ‘एनएससीएस’चे सल्लागार

ऑपरेशन सिंदूरमध्ये निभावली महत्त्वाची भूमिका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आर्मी स्टाफचे उपप्रमुख (रणनीती) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे (‘एनएससीएस’ म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटेरिएट) नवे लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणारे ते पहिले कार्यरत अधिकारी ठरले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी लष्करी कारवायांचे महासंचालक हे पद सांभाळताना महत्त्वाची भूमिका निभावली होती. ते डिसेंबर 1989 मध्ये देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीमधून कुमाऊँ रेजिमेंटमध्ये कमिशन झाले होते. त्यांनी आपल्या दीर्घ सेवेदरम्यान उपसेनाप्रमुख (रणनीती) आणि श्रीनगरस्थित 15 व्या कॉर्प्सचे (चिनार कॉर्प्स) जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) म्हणूनही यशस्वीपणे कामगिरी बजावली. यापूर्वी त्यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​