Uncategorized

कळंगुट‑बागातील १७ शॅक्स जमीनदोस्त

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई : सर्व बेकायदेशीर शॅक्सचे अतिक्रमण

म्हापसा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यटन खात्याने काल मंगळवारी कळंगुट-बागा किनाऱ्यावरील 17 बेकायदेशीर शॅक्स जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केले. या शॅक्सनी अतिक्रमण केले होते. याबाबत मिनीनो फर्नांडीस यांनी जनहित याचिका सादर करुन मुंबई उच्च न्यायालयाचे या बेकायदेशीरपणाकडे लक्ष वेधले आहे. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. कळंगुट, बागा, कांदोळी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात 70 जणांनी अतिक्रमण केल्याची माहिती पर्यटन खात्याच्या संचालकांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

मंगळवारी सकाळपासून बेकायदेशीर शॅक्स पाडण्याची धडक कारवाई सुरु झाली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन जेसीबींच्या मदतीने दिवसभरात हे 17 शॅक्स पाडण्यात आले. यावेळी पर्यटन खात्याचे अधिकारी, बार्देशचे मामलेदार, तलाठी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. हे बेकायदेशीर शॅक्स पाडण्यासाठी जेव्हा यंत्रणा प्रत्यक्ष जागेवर दाखल झाली, त्यावेळी शॅकधारकांपैकी कोणीही कारवाईला विरोध केला नाही. त्यामुळे कारवाई शांततेत पार पडली. काहींनी स्वत:

शॅकमधील आपले सामान बाहेर काढले.ही कारवाई सर्व शॅक संपूर्णत: जमिनदोस्त होईपर्यंत चालूच राहणार असल्याचे पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई करण्याविषयी संबंधित शॅकधारकांना नोटिसा जारी केल्या होत्या. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदोळी, कळंगुट परिसरातील बेकायदा शॅकचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. एकूण 12 परिसरातील 3 परिसरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. इतर भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे, असे पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​