Uncategorized

रेकॉर्ड ब्रेक कमाईपासून राजा शिवाजी चित्रपट फक्त इतकाच दूर …

Raja Shivaji Box office Collection : सध्या मनोरंजन विश्वात अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा कल्ला केला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच एकाच वेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटासाठी सलमान खान, विद्या बालन, संजय दत्त आणि अभिषेक बच्चन या कलाकारांनी कोणतंही मानधन घेतलं नाही अशी माहिती नुकतीच रितेश देशमुख याने माध्यमांशी बोलताना दिली.

रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटावर सुरुवातीला वादाचे ग्रहण लागले पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील विद्रोही या शब्दावरुन मोठे वादंग उठले होते. याच मुद्द्यावरुन सोशल मिडीयावर रितेश देशमुखला ट्रोल करण्यात आले होते. पण रितेश यावर ठाम राहिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार राजा शिवाजी या चित्रपटाने पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत अंदाजे ५२.२५ कोटी रुपयांची (४३ कोटी रुपये निव्वळ) कमाई केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद कमाई करणारा चित्रपट आहे. चित्रपटाने यापैकी अंदाजे ३५.७५ कोटी रुपये (२९.५० कोटी रुपये निव्वळ) मराठीतून आणि अंदाजे १६.७५ कोटी रुपये (१३.५० कोटी रुपये निव्वळ) हिंदीतून कमाई केली आहे.

राजा शिवाजी (Raja Shivaji Movie) या चित्रपटाने सोमवारी कलेक्शनवर चांगलीच पकड ठेवली होती, ज्यामुळे १०० कोटींचा टप्पा गाठला जाईल असे वाटत होते पण सध्या हा अंदाज खोटा ठरल्याचे दिसत आहे. अर्थात तो टप्पा गाठण्याची शक्यता अजूनही आहे, पण जर आठवड्याच्या इतर दिवशी मंगळवारप्रमाणेच कमात घट झाली, तर आता हा टप्पा गाठणे कठीण होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. .या चित्रपटाची सुरु असणारी कमाई जर स्थिर झाली तर हा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जर चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला, तर तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल. ‘छावा’ आणि ‘तान्हाजी’ यांसारख्या मराठा साम्राज्यावर आधारित ऐतिहासिक हिंदी चित्रपटांनी महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवल्याची उदाहरणे आहेत. ‘तान्हाजी’ आणि ‘छावा’ या चित्रपटांना महाराष्ट्रातून  चांगली कमाई झाली होती; सर्वसाधारणपणे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे चित्रपटही असेच यश मिळवतात. ‘राजा शिवाजी’ किती कमाई करू शकतो, याचे अधिक संकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मिळतील पण तोपर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच हीट ठरला आहे. 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​