ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषक संघ जाहीर

मेलबर्न, वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या यावषीच्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउनला वगळले आहे. 41 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.20 च्या सरासरीने 34 बळी घेणाऱ्या ब्राउनने या स्पर्धेच्या मागील दोन आवृत्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु निवड समितीने तिच्या जागी अननुभवी डावखुरी गोलंदाज लुसी हॅमिल्टनची निवड केली आहे, जिने आतापर्यंत फक्त एक टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकूण चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ब्राउनच्या जागी हॅमिल्टनचा समावेश हा संघातील एकमेव मोठा आश्चर्याचा धक्का आहे, कारण अलीकडे दुखापतीच्या समस्या असूनही डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मोलिन्यू संघाचे नेतृत्व करणार आहे. हॅमिल्टनने गेल्या वषीच्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते आणि मार्चपासून, वेस्ट इंडिज दौऱ्यात आणि वनडे चॅम्पियन भारताविऊद्धच्या घरच्या मालिकेत तिने सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे.
ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकाच्या गट 1 मध्ये दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्ससोबत आहे. स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघ 13 जून रोजी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे द.आफ्रिका संघाशी भिडणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघ : सोफी मोलिन्यू (कर्णधार), निकोला केरी, अॅश गार्डनर, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेअरहॅम. प्रवासी राखीव खेळाडू : ताहलिया विल्सन ऑस्ट्रेलियाचे टी-20 विश्वचषक सामने (गट फेरी)
विऊद्ध दक्षिण आफ्रिका : 13 जून, मँचेस्टर, दुपारी 2:30 वाजता;
विऊद्ध बांगलादेश : 17 जून, हेडिंग्ले, सकाळी 10:30 वाजता;
विऊद्ध नेदरलँड्स : 20 जून, हॅम्पशायर बाऊल, सकाळी 10:30 वाजता;
विऊद्ध पाकिस्तान : 23 जून, हेडिंग्ले, सायंकाळी 6:30 वाजता;
विऊद्ध भारत : 28 जून, लॉर्ड्स, दुपारी 2:30 वाजता.
Source link



