Uncategorized

उद्धट उत्तर देणाऱ्या वीज अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी धरले धारेवर

वीज बिले न भरण्याचा घेणार आचरा ग्रामसभेत ठराव

आचरा : प्रतिनिधी

कोट्यावधी रुपये खर्च करून एकदाही पूर्ण क्षमतेने सुरु न झालेली भूमिगत विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सोमवारी आचरा सब स्टेशनवरून दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत ठेवला होता त्यानंतरही पुन्हा वारंवार खंडित होत राहिल्याने मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत कार्यालयावर धडक दिली. यावेळी आचरा कार्यालयात कोणतेही सक्षम अधिकारी हजर नव्हते. ग्रामस्थ जमा झाल्याचे समजल्यानंतर तब्बल तासाभराने आतरिक्त कार्यभार स्वीकारून हजर झालेल्या अधिकाऱ्याने आचरा सरपंचासह उपस्थित ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी त्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत गावातून एकही वीजबिल भरले जाणार नसल्याचे अधिकाऱ्याला सांगत त्यासाठी आचरे गावाची विशेष ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय घेत भूमिगत विद्युत वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडीत केल्यास पूर्ण गाव जमवून वीज वितरणला धडक देणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्यासह पंस सदस्य गणेश तोंडवळकर,उपसरपंच संतोष मिराशी, चावलं मुजावर पंकज आचरेकर, जयप्रकाश परुळेकर, परेश सावंत, शैलेश मुणगेकर नातू, सिद्धार्थ कोळगे अरविंद घाडी,उमेश सावंत, सौमित्र राणे, दीपक आचरेकर, दिलीप कोदे, ग्रामस्थ उपस्थित होते.गेला महिनाभर वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठयामुळे आधीच हैराण झालेल्या आचरावासियांनी सोमवारी दिवसभर मेन्टेनन्स च्या नावाखाली खंडित ठेवलेला होता. तरीही रात्री आठ ते दहा वेळा लाईटचे ये जा चालूच होते. मंगळवारी सकाळीही तीच स्थिती होती सोमवारी रात्र अंधारातच जागून काढलेल्या ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंतच झाला. यामुळे संतप्त आचरा ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बाजारपेठ येथील वीज मंडळ कार्यालयावर धडक दिली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​