Uncategorized

सिंधूचे आव्हान उपांत्यफेरीत समाप्त

वृत्तसंस्था, अॅडलेड

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. या पराभवामुळे सिंधूचा जेतेपद मिळविण्याचा दुष्काळ अद्याप सुरूच आहे.

शनिवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या टॉपसिडेड अकेनी यामागुचीने पीव्ही सिंधूचा 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 43 मिनिटांत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सिंधूच्या या पराभवामुळे विश्व बॅडमिंटन टूरवरील 500 दर्जाच्या ऑस्ट्रेलियन सुपर बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात सिंधूने आतापर्यंत दोनवेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. यापूर्वी तिने मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​