Uddhav Thackeray | मोठी बातमी: ममता बॅनर्जींनंतर आता उद्धव ठाकरेंना महाधक्का; ६ खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार

दिल्ली – राज्याच्या राजकरणातुन एक मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातून 6 खासदार फुटले असल्याची माहिती समोर येत आहे… तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली होती. 20 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले.
त्यांनंतर महाराष्ट्रात एका बड्या पक्षात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात होतं.. हा पक्ष दुसरा तिसरा कोणता नसुन
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे… तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली ही घटना ताजी असतानाचउद्धव ठाकरे यांना देखील मोठा धक्का बसला आहे…. गेले बरेच दिवसांपासुन ऑपरेशन टायगर अंतर्गत हे सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या आज याला पुर्णविराम मिळाला आहे…
शिवसेना ठाकरे गटांचे सहा खासदार अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार हे निश्चित झालं आहे. सहा फुटीर खासदारांचा गट देखील स्थापन झाल्याची माहिती आहे. गटस्थापनेनंतर शिवसेनेत हे सर्व सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आता शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. या खासदारांनी गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, या गटस्थापनेनंतर आता ते शिवसेनेत विलीन होणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर देखील गटाची स्थापना झाली आणि विलीनीकरण होणार हे निश्चित झालं आहे.
काय आहे प्रकरण
गेले बऱ्याच दिवसांपासुन शिवसेना ठाकरे गटात ठीक नसल्याचे बोललं जात होतं… शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या… त्यामुळे सावध भूमिका घेत शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. बाकी 6 खासदार बैठकीला उपस्थित नव्हते… परंतु खा. संजय राऊत यांनी या चर्चांना कोणतेही तथ्य नसल्याचे बोलत 6 खासदार 5 व्हिसीद्वारे उपस्थित असल्याचा दावा केला होता.. .तसेचया अफवांवर विश्वास ठेवु नका असे सांगितले होते.. पण आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे…
Source link



