Uncategorized

Trump get death threat “ट्रम्प आता मृत्यूसाठी तयार राहा” इराणी वृत्तपत्राची खुली धमकी

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या इराणी वृत्तपत्रातून आता तुम्ही अचानक होणाऱ्या मृत्यूसाठी तयार राहा अशी थेट धमकी दिली आहे.

शनिवारी रात्री सिनेटर ग्रॅहम यांच्या निधनानंतर , एका इराणी वृत्तपत्राने आपल्या मुखपृष्ठावर एक फोटो प्रसिद्ध केला. या फोटोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका गुडघ्यावर बसून, अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा फोटो हातात धरलेले दिसत आहेत.

या फोटोत ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अनेक वरिष्ठ अमेरिकन व इस्रायली अधिकारी होते. या फोटोखाली ‘अचानक मृत्यूसाठी तयार राहा’ असा मथळा होता. हा फोटो एआय जनरेटेड आहे हे स्पष्टपणे दिसत असले तरी यातून अमेरिकेबद्दलचा इराणचा राग दिसून येत आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार तेहरानमधील प्रसारमाध्यमे आणि सरकारी माध्यमांनी ग्रॅहम यांच्या मृत्यूचे उघडपणे स्वागत केले. इराणी सरकारी दूरचित्रवाणीने प्रसारित केलेली एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये निवेदकाने “युद्धखोर, इराण-विरोधी, अमेरिकन सिनेटर” “नरकात पाठवल्याबद्दल” इराणी लोकांचे अभिनंदन केले होते.

हमशहरी या इराणच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात छापलेला एआय जनरेटेड फोटो

“अचानक मृत्यूसाठी तयार राहा”

‘हमशहरी’ या सरकारी राष्ट्रीय दैनिकाने एक फोटो प्रसिद्ध केला, ज्यात ग्रॅहम यांचा फोटो हातात धरून ट्रम्प रडत असल्याचे दिसत होते. नेतान्याहू, हेगसेथ आणि इतर काहीजण या फोटोत आश्चर्यचकित झालेले दाखवण्यात आले होते. मथळा होता, ‘अचानक मृत्यूसाठी सज्ज व्हा‘.

शनिवारी ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि अमेरिकेचे  ग्रॅहम यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यालयाने या आजाराचे वर्णन ‘अल्पकालीन आणि अचानक उद्भवलेला आजार’ असे केले होते. त्यानंतर ही बातमी अमेरिकन आणि इस्रायली नेत्यांना एक इशारा देत असल्याचे दिसून आले. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक वैद्यकीय तपासणी अहवालानुसार, महाधमनी फाटल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

रशियाविरोधात युक्रेनला मदत

विशेष म्हणजे, दक्षिण कॅरोलिनाच्या या सिनेटर दिवंगत लिंडसे ग्रॅहम यांनी रशियासोबतच्या युद्धात युक्रेनला लष्करी मदतीचे सातत्याने समर्थन केले होते. गाझा संघर्षादरम्यान ते इस्रायलचेही खंदे समर्थक होते आणि त्यांनी इराणच्या सध्याच्या नेतृत्वाला सत्तेवरून हटवण्याची वारंवार मागणी केली होती.

२८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर, ग्रॅहम यांनी इराणी सरकार उलथवून टाकण्याचे जाहीरपणे आवाहन केले. इतकेच नव्हे तर, त्यांनी इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येची मागणीही केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​