न्हावेलीत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम – Tarun Bharat

न्हावेली /वार्ताहर : न्हावेली विवरवाडी गणपती मंदिरात बुधवार २९ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार २९ रोजी दत्तमाला मंत्र होम,अक्कलकोट निवासी सद्गगुरु श्री स्वामी समर्थ पादुका,सकाळी ८.३० वाजता शरीर शुद्धी,गणपती पूजन,पुण्याहवाचन,संभार दान ९.३० वाजता पादुकावर सार्वजनिक अभिषेक आणि बहुमान दी देवता मुख्य देवता अभिषेक स्थापन पूजन,१० वाजता यजमान कडून स्वामींवर दुग्ध अभिषेक आणि पूजा,१०.३० वाजता अग्नी स्थापन,ग्रह स्थापन पूजन आणि हवन,दुपारी १२.३० वाजता अग्नीची पूर्णाहूती,श्रेय दान बैगेरे कर्म समाप्ती पर्यत,१ वाजता साग्र संगीत आरती,मंत्रपुष्प प्रार्थना,१.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता आरती,७.३० वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन राजन कालवणकर यांनी केले आहे.
Source link



