Sangli Suicide Case | सांगलीत खळबळ: ‘लग्नासाठी धर्म बदल’ या अटीमुळे १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या; तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल.

सांगली: लग्नासाठी धर्म बदलण्याची अट तरुणीने ठेवल्याने खणभाग राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्वांक प्रमोद शेवाळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीसह दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी साहिल बागवान (रा. खणभाग, सांगली) आणि सामिया बागबान (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत दुर्वांकची आई भारती प्रमोद शेवाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे नोकरी करत असलेला दुर्वांक शेवाळे हा काही दिवसांपूर्वीच सांगलीत आला होता. त्याच्या घराजवळच राहण्ाया वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधून मधून येत असते.
ती त्या महिलेची नातेवाईक आहे. ती तरुणी काही काळ इकडे राहत असल्याने या दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते, मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल, अशी अट घातल्याचा दावा दुर्वांकुरचे नातेवाईक करत आहेत. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता, असेही सांगितले जात आहे.
गुरुवारी दुपारी दुर्वांक फोनवर बोलतच घरात गेला आणि त्याने गळफास लावून घेतला. स्वत? च्या मोबाईलमधील रिचार्ज संपल्यामुळे दुर्वांकने त्याच्या आईच्या मोबाईलवरून संबंधित तरुणीशी चॅटिंग केले होते. गुरुवारी दुपारी याच विषयावरून फोनवर बोलत असतानाच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
नातेवाईकांनी त्या दोघांमधील चटिंग पोलिसांना दाखवूनही सुरूवातीला पोलिसांनी ठोस कारवाई केली नव्हती. पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप करत केला जात होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दुर्वांकला आत्महत्येस प्रवृत्त करण्प्रया दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या संतप्त नातेवाईकांनी केली होती.
सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप होत असतानाच, तीव्र जनआक्रोश आणि नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सांगली शहर पोलिसांनी अखेर फिर्यादीनुसार, दोन्ही संशयितांनी संगनमत करून दुर्वांकला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी बारंबार दबाव टाकत मानसिक व शारीरिक त्रास दिला. या सततच्या छळाला कंटाळून दुर्वांकने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला पडद्याच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचाआरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला होता. या आरोपांमुळे शहरात संतापाची लाट उसळली. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कोणतीही सबलत न देता कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका संघटनांनी मांडली.
या प्रकरणातील आरोप हे फिर्यादीतील दाव्यांवर आधारित असून, तपास सुरू आहे. आरोपींची दोषी किंवा निर्दोषता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल.
Source link



