Uncategorized

मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा!

 

मुंबई -राज्यभरात मान्सुन सक्रीय झाला असुन मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे..
गेल्या दोन दिवसात तर मुसळधार पाऊसाने मुंबईला झोडपुन काढले आहे.. त्यामुळे यांचा फटका सर्वसामान्य आयुष्याला बसत असल्याचे चित्र दिसत आहे.पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. सध्या अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.. अंधेरी सबवे तब्बल चार ते पाच फूट पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.सरकारकडून पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे,

एकीकडे या मुसळधारपावसाचा फटका मुंबईतील तिन्ही लोकल मार्गाला बसला आहे.. रेल्वे वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे…. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची गोची झाली आहे.. लोकलने प्रवास लाखोंच्या संख्येने सर्वसामान्य करतात.. त्यामुळे रेल्वे वाहतूक उशिराने येणे याचा परिणाम त्यांच्या सर्वसामान्य आयुष्याला बसत असल्याचे चित्र दिसत आहे..अनेक लोक दैनदिन कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

तर दुसरीकडे या मुसळधार पाऊसामुळे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने मुंबई हादरली आहे.30 जुन रोजी मुंबईतील चेंबर परिसरात एका स्कुल बसवर भले मोठे झाड पडलं. यामुळे 10 मुले गंभीरीत्या जखमी झाले तर एकाचा मृत्यु झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यातही 2 व 3 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार-

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होतंय. त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेलच त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एकूणच, राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​