Uncategorized

Sangli Crime | जनतेच्या आरोग्याशी खेळ? विनापरवाना केंद्रात अफगाणिस्तानचा बेदाणा; एफडीएची मोठी कारवाई!

                                    कवठेमहांकाळमध्ये ६९ लाखांचा आयात बेदाणा जप्त,

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळतालुक्यातील चोरोची येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने धडक कारवाई करत तब्बल ६९ लाख १७हजार ५९६ रुपयेचा २६ हजार ६ किलो ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त केला आहे. विनापरवाना प्रक्रिया केंद्रात हा साठा आढळून आल्याने प्रशासनाने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई केली.

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नि. सु. मसारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने चोरोची येथील मे. अजितकुमार पाटील बेदाणा प्रोसेसिंग सेंटर, गट नं. ७६७, जांभूळवाडी फाटा येथे तपासणी केली. तपासणी दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये मशिनरीच्या सहाय्यानेबेदाण्याचे निटिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग व पॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच शेतक्रयांकडून आलेल्या द्राक्षांवर प्रक्रिया करून बेदाणा तयार करण्याचे कामही सुरू होते. यावेळी पथकाला अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे १० किलो क्षमतेचे पांढरे बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून आले.

चौकशीत हा माल दिल्ली येथील ‘देव इम्पेक्स’ या कंपनीमार्फत आयात करण्यात आल्याचे समोर आले. संबंधित माल न्हावा शेवा बंदरातून सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील गोदामाच्या नावाने आणला होता. मात्र, हा आयात माल चोरोची येथील विनापरवाना प्रक्रिया केंद्रात कशासाठी व कोणत्या परवानगीवर पाठविला, याबाबत कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत.तपासणीमध्ये संबंधित बेदाण्याच्यागुणवत्तेबाबत अधिकृत विश्लेषण अहवाल उपलब्ध नसल्याचेही आढळून आले. तसेच संबंधित प्रक्रिया केंद्राकडे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक नोंदणी अथवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आयात बेदाणा कायद्यातील मानकांनुसार नसल्याच्या संशयावरून प्रशासनाने साठा जप्त केला.

जप्त केलेल्या बेदाण्याचे नमुने तपासणीसाठी अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्न व औषधे सहायक आयुक्त नि.सु. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. ने. जिनगर, अ. अ. पवार आणि सु. स. खांडेकर यांनी केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​