Uncategorized

Private Travel Operators Play Fast and Loose with Passengers’ Lives

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक : आरटीओकडून कारवाई

बेळगाव : खासगी आराम बसमधून सुरू असलेल्या मालवाहतुकीला चाप बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कडक अंमलबजावणी केली जात आहे. मालवाहतुकीसाठी ट्रॅव्हल्सना बसविण्यात आलेल्या लोखंडी शिड्या काढण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. बसच्या टॉपवर साहित्य बांधून केल्या जाणाऱ्या वाहतुकीला यापुढे चाप बसणार आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आराम बसमधून होणारी क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक थांबणार आहे. बेळगावमधून दररोज अनेक शहरांना आराम बस उपलब्ध आहेत. सध्या ट्रॅव्हल्स चालकांनी उन्हाळी सुट्या व वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे तिकिटांचे दर कमालीचे वाढविले आहेत. त्यातच आराम बसमधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जात आहे. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग पुढे सरसावला आहे.

आरटीओकडून अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. ट्रॅव्हल्समधून केवळ प्रवाशांचे साहित्य नेण्याची परवानगी असते. परंतु मोठ्या प्रमाणात ट्रान्स्पोर्टचे साहित्य भरून त्याची वाहतू केली जात आहे. बेळगावमध्ये  यंत्रमागासाठी लागणारे साहित्य अशा ट्रॅव्हल्समधून भरून आणले जाते. तसेच खासगी ट्रान्स्पोर्ट चालकांचे साहित्यही भरले जाते. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक केली जात असल्याने हा एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने मागील काही दिवसात अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे. बसच्या टॉपवर साहित्य चढविण्यासाठी असलेल्या लोखंडी शिड्या काढून टाकत दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ट्रॅव्हल्सच्या खालील भागात केवळ प्रवाशांच्या साहित्यासाठी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी कोणतेही ट्रान्स्पोर्टचे साहित्य ठेवू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​