Uncategorized

Petrol | सोलापुरात पेट्रोल १११.८२ तर डिझेल ९८.५० रुपये

युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे
सोलापूर : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचे परिणाम पेट्रोल, डिझेलच्या दरावर झाले आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत सलग चौथ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
सोमवारी (दि. २५) तेल कंपन्यांनी पेट्रोल २ रुपये ६१ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर २ रुपये ७१ पैशांची दरवाढ केली. सोलापुरात पेट्रोल १११.८२ तर डिझेल ९८.५० रुपये झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दररोज लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात दररोज लाखो लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होती. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने याचा फटका वाहन चालकांसह सर्वसामान्यांनासुद्धा बसत आहे.
 
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक भाडे महागले असून किराणा, भाजीपाला, दूध, दळण यासह चारचाकी, दुचाकीच्या इंधनासाठी खर्चात वाढ झाल्याने महिन्याचे बजेत दोन ते अडीच हजार रुपयांनी वाढले आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपूर्वीच हॉस्टेलिंग, चहा, नाश्ता, खानावळ, रिक्षा, प्रवास भाडे, वीजबिल यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. वाढती दरवाढ आणि महागाईमुळे मध्यमवर्गीय हैरान झाले आहेत.
शेती कामांवर परिणाम
शेती कामांमध्ये ट्रॅक्टर तसेच बोअरिंग, विहीर कामांसाठी जेसीबी व पोकलेनचा वापर करावा लागत असल्याने डिझेलला वाढती मागणी आहे. मागील काही दिवसांत ही मागणी वाढल्याने, तसेच काही पंपांवर तुटवडा असल्याने इंधनपुरवठा विस्कळीत झाला. इतर वाहनधारकांनाही डिझेलसाठी पंप शोधण्याची वेळ आली, तर पाणीपुरवठा करणारे खाजगी टैंकर व इतर वाहनांनाही डिझेल मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

दुचाकी व चारचाकीचा खर्च ४०० ते ५०० रुपयांनी वाढला
बहुतांश कुटुंबात साधारण एक दुचाकी व एक चारचाकी आहे. दिवसाला २५ ते ३० किमी हे वाहन फिरविल्यास १२० ते १५० रुपयांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे एक दुचाकी व एक चारचाकी असलेल्या कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चात किमान ४०० ते ५०० रुपयांनी वाढ होणार आहे.
 

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​