Panhala Crime | शेतात गेल्यानंतर नेमकं काय घडलं? पन्हाळ्याजवळील कोलोलीत महिलेचा थरारक खून!

पन्हाळा तालुक्यात खळबळ! ५५ वर्षीय महिलेचा शेतात खून
पन्हाळा : कोलोली येथे शेतातकामानिमित्त गेलेल्या एका महिलेवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. छबुताई सर्जेराव पाटील (बय ५५, रा. कोलोली) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कोलोली गाव हादरले असून नेमका खून कोणी व कशासाठी केला हे स्पष्ट होत नसल्याने या खुनाचा उलगडा करून यातील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोली येथील छबुताई पाटील या रविवारी सायंकाळी ५.३० ते रात्री ११ च्या सुमारास गावातील मासुलकी नावाच्या शेतात कामानिमित्त गेल्या होत्या. पण रात्री त्या घरी परत न आल्याने घरातील सदस्यांनी त्यांचा हातांवर, डोक्यावर धारदार शस्त्राचे वारकेली.
दरम्यान, शोधाशोध करत असताना सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास छबुताई यांचा मृतदेह शेतात आढळला. यावेळी धारदार शस्त्राने त्यांच्या हाताबर व डोक्यावर बार झाल्याचे दिसून आले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन अज्ञात इसमांकडून ठार झाल्याचे उघडकीस आले. याबाबत नातेवाईकांनी पन्हाळा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शाहुवाडी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक आप्पासो पोवार यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतची फिर्याद छबुताई यांचे दिर बाबासो श्रीपती पाटील यांनी दिली आहे.
Source link



