Uncategorized

अॅपलकडून नोकर कपात : 200 जणांना नारळ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आयफोन निर्माता कंपनी अॅपल इंक कर्मचारी कपातीचे धोरण राबविणार असल्याची माहिती सुरु झाली आहे. नव्या माहितीनुसार येत्या काळात 200 जणांना कंपनी कामावरून कमी करणार असल्याची माहिती आहे.

सदरची माहिती ब्लूमबर्ग यांच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. कंपनी सिरी डिजीटल असिस्टंट आणि व्हिजन प्रो हेडसेट यांच्याशी संबंधित संघ सदस्यांना कमी करणार असल्याचे समजते. हे सदस्य सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागाचे असल्याचे समजते. गेमिंग संबंधित विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कपातीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती आहे.  व्हिजन प्रो विभागामध्ये जवळपास 100 जणांची नोकरी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे सॉफ्टवेअर विभागामधील 100 जणांना पदावरून कमी केले जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या सदस्यांकडे एआय वैशिष्ट्यांसंबंधीत महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​