Pandharpur Crime | पंढरपूर न्यायालय परिसरात खळबळ! ‘मोक्का’तील आरोपीला भेटायला आले अन् कारमध्ये सापडलं हत्यार

पंढरपुरात नंबर प्लेट नसलेल्या कारमध्ये लोखंडी कोयता आढळला
पंढरपूर -मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित तथा माजी जि.प. सदस्य गोपाळ बाजीराव अंकुशराव (रा. पंढरपूर) यांना कर्नाटक पोलिसांनी पंढरपूर येथील न्यायालयात हजर केल्यानंतर मेटण्यासाठी झालेल्यागर्दीतील एका संशयित कारमध्ये प्राणघातक लोखंडी कोयता आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी संशयित कार जप्त केली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मारुती बाळू कोळी (वय २२), रितेश धनंजय गोडसे (वय १९, रा. इसबावी) व तेजस नागनाथ कांबळे (रा. वात्मीकीनगर, इसबावी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस नाईक साहील तांबोळी यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
माजी जि.प. सदस्य अंकुशराव सध्या कारागृहात असून, मंगळवारी कर्नाटक पोलिसांनी तारखेकरिता येथील न्यायालयात हजर केले. या दरम्यान समर्थकांनी भेटण्यासाठी न्यायालय आवारात बरीच गर्दीकेली होती. हा प्रकार समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक न्यायालयात पोहोचले.
या दरम्यान न्यायालयाच्या आवारात पुढील बाजूस नंबर प्लेट नसलेली एक वें गनार कार (एचएच १३-डीटी. ७५४६) पोलिसांना दिसून आली. संशय आल्याने पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता पुढील डाव्या सीटखाली एक प्राणघातक लोखंडी कोयता आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारमधील मारुती कोळी व रितेश गोडसे या दोघांना ताब्यात घेतले. मात्र, तिसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. तेजस कांबळे (रा. वाल्मीकीनगर) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कारमधील कोयत्याविषयी केल्याचे नमूद करण्यात आले विचारपूस केली असता संशयित दोघांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. अखेर न्यायालयाला परवानगीचे पत्र देऊन या प्रकरणी शहर पोलिसांत फिर्याद दाखल आहे.
Source link



