Uncategorized

सांगेली माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.१२ टक्के

ओटवणे : प्रतिनिधी

सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९५:१२ टक्के लागला. या परीक्षेला बसलेल्या ४१ विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक आर्या राजेश गोसावी ९१:२०% ४५६ गुण, द्वितीय क्रमांक शमिका संतोष धर्णे ९०.८० % ४५४ गुण, तर तृतीय क्रमांक कुणाल अभय मेस्त्री ८३.४० % ४१७ गुण या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत १२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १२ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पुनाजी राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, सर्व संस्था पदाधिकारी प्राचार्य रामचंद्र घावरे शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​