Uncategorized

Nepal Political Crisis नेपाळमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, माजी गृहमंत्री आता पुन्हा एकदा…

जूनच्या पहिल्या आठवड्यात नेपाळच्या राजकारणात काय घडणार आहे? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी राजकिय घडामोड सध्या सुरु आहे. असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्या सरकारचे माजी गृहमंत्री आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेले सुदान गुरुंग परतणार आहेत. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच मोठ्या वादामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले होते.

सुदान गुरंग परतणार?

मिळालेल्या माहितीनुसार माजी गुप्तचर एजंट लकी बिष्ट यांनी गुप्त माहितीच्या आधारे दावा केला आहे की, नेपाळचे माजी गृहमंत्री सुदान गुरुंग आपल्या पूर्वीच्या पदावर परत येऊ शकतात. त्यांनी या परतण्याच्या तारखेबद्दलही माहिती दिली आहे. लकी बिष्ट हे तेच गुप्तचर तज्ञ आहेत ज्यांनी नेपाळ झेन-जी आंदोलनाच्या काही महिन्यांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती.

लकी बिष्ट यांनी पुढे लिहिले, “नेपाळच्या लोकांना लवकरच या जमिनीवरील वास्तवाची आणि मोठ्या राजकीय घडामोडीची अधिकृत बातमी ऐकायला मिळेल.” नेपाळी राजकारणाशी परिचित असलेल्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून टाकण्यात आले होते.

काठमांडूमध्ये राजकिय भूकंप

लकी बिष्ट यांनी दिलेल्या माहितीमुळे काठमांडूच्या राजकीय वर्तुळात आधीच खळबळ उडाली आहे . नेपाळ खबरमधील एका वृत्तानुसार, नेपाळी काँग्रेस संसदीय पक्षाचे उपनेते अभिषेक प्रताप शाह यांनी संसदेत असा संशय व्यक्त केला आहे की, सुदान गुरुंग यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदान गुरुंग यांच्याविरुद्धच्या चौकशीत पारदर्शकतेची मागणी करताना ते म्हणाले, ‘माजी गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी सार्वजनिक केलेली मालमत्ता अत्यंत असामान्य आणि संशयास्पद आहे, त्यामुळे तिची तात्काळ आणि निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे.

नेपाळमध्ये गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा वाद नेमका काय होता?

बालेन शाह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच, आर्थिक अनियमिततेवरून झालेल्या टीकेमुळे सुदान गुरुंग यांना एप्रिल २०२६ मध्ये गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला . सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या झेन-जी चळवळीत गुरुंग हे एक प्रमुख व्यक्तिमत्व होते.

गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ‘निष्पक्ष चौकशी’ सुनिश्चित करण्यासाठी आपण पद सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते.  ३८ वर्षीय गुरंग यांनी म्हटले होते, ‘माझ्यासाठी पदापेक्षा नैतिकता अधिक महत्त्वाची आहे आणि लोकांच्या विश्वासापेक्षा मोठी शक्ती नाही… सार्वजनिक जीवन स्वच्छ असले पाहिजे आणि नेतृत्व उत्तरदायी असले पाहिजे.’


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​