Uncategorized

लंकेची विंडीजवर 142 धावांची आघाडी

ग्रिव्सच्या 180 धावा, विंडीजच्या पहिल्या डावात 499 धावा, शाय हॉपचेही शतक, असिता फर्नांडोचे 5 बळी

वृत्तसंस्था, नॉर्थ साऊंड (अॅन्टीग्वा)

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर लंकेने यजमान विंडीजवर 142 धावांची आघाडी मिळविली आहे. लंकेने पहिल्या डावात विंडीजवर 50 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात 2 बाद 92 धावा जमविल्या. तत्पूर्वी विंडीजचा पहिला डाव 499 धावांवर समाप्त झाला. जस्टिन ग्रिव्सने 180 धावांची खेळी केली. ही दुसरी कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे.

दोन सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत असून विंडीजने पहिल्या कसोटीत लंकेचा एक डाव 217 धावांनी पराभव करत आघाडी मिळविली होती. विंडीजने ही कसोटी अनिर्णीत राखल्यास विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ते 2022 नंतर पहिली कसोटी मालिका जिंकतील.

या दुसऱ्या कसोटीतील खेळाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये दोन्ही संघांकडून 1140 धावा जमविल्या गेल्या आणि 21 गडी बाद झाले. विंडीजच्या ग्रिव्हेसने कसोटीतील आपले तिसरे शतक झळकविले. तसेच त्याने हॉपसमवेत पाचव्या गड्यासाठी 242 धावांची द्विशतकी भागिदारी केली. पाचव्या गड्यासाठी ही विंडीजतर्फे दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी आहे. शाय हॉपने 112 धावा झळकविल्या. गेल्या डिसेंबरमध्ये हॉप आणि ग्रिव्स यांनी न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या गड्यासाठी 196 धावांची भागिदारी केली होती. हॉपने 140 तर ग्रिव्हेसने नाबाद 202 धावा जमवित ही कसोटी अनिर्णीत राखली होती. या दुसऱ्या कसोटीत विंडीजची पहिल्या डावात स्थिती 4 बाद 144 अशी होती.त्यानंतर हॉप आणि ग्रिव्हेस यांच्या या द्विशतकी भागिदारीमुळे विंडीजने 5 बाद 386 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजच्या पहिल्या डावात शेवटच्या पाच फलंदाजांनी 113 धावांची भर घातली. विंडीजचा पहिला डाव 499 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे लंकेने 50 धावांची आघाडी मिळविली. या सामन्यात लंकेने आपला पहिला डाव 9 बाद 549 धावांवर घोषित केला होता. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 130 धावांत 5 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची असिता फर्नांडोची ही तिसरी खेप आहे. प्रभात जयसूर्याने 131 धावांत 3 बळी मिळविले. हॉपने आपल्या शतकी खेळीमध्ये 10 चौकार ठोकले. हॉपला दुखापतीमुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने शानदार शतक झळकविले. गेल्या पाच कसोटी सामन्यातील हॉपचे हे तिसरे शतक आहे.

50 धावांनी आघाडी घेतलेल्या लंकेने दुसऱ्या डावाला सुरूवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 2 बाद 92 धावा जमविल्या. लंकेच्या पहिल्या डावात शतक झळकविणारा उदारा खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर निशान फर्नांडो 20 धावांवर तंबूत परतला. चंडीमल 40 तर कमिंदु मेंडीस 30 धावांवर खेळत होते. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 60 धावांची भागिदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 9 बाद 549, विंडीज प. डाव सर्वबाद 499 (ग्रिव्हेस 180, शाय हॉप 112, असिता फर्नांडो 5-130, जयसूर्या 3-131), लंका दु. डाव 2 बाद 92 (उदारा 0, निशान फर्नांडो 20, कमिंदु मेंडीस खेळत आहे 30, दिनेश चंडीमल खेळत आहे 40).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​