Maharashtra Weather Update | पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा उकाडा! मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार?

मुंबई -सध्या देशात पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवू लागला आहे. जुलैच्या सुरुवातीला अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला, पण त्यानंतर पावसाने अशी काही दडी मारली की आकाशातून थेट ढगच गायब झाले. यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या असून, पाण्याची चिंताही वाढत चाललीये…
सगळ्यात आधी पाऊस गायब होण्यामागचं कारण समजून घेऊया. हवामान विभागाच्या मते, याचं मुख्य कारण प्रशांत महासागरात दडलं आहे. तिथे आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळाने मान्सूनचे बाष्पयुक्त वारे स्वतःकडे खेचून घेतले, ज्यामुळे भारतातील ७० ते ८० टक्के ढग शोषले गेले. त्यातच समुद्राचे तापमान वाढवणाऱ्या ‘एल निनो’ या जागतिक स्थितीमुळे मान्सूनचा प्रवाह खंडित झाला.
पण आता प्रश्न पडतो की, हा मान्सून देशात परत कधी येणार? तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रशांत महासागरातून आलेली एक नवीन हवामान प्रणाली सध्या बंगालच्या उपसागरात पोहोचली आहे. या प्रणालीमुळे समुद्रावर दाट ढग जमा होऊ लागले असून, ती समुद्राकडून बाष्पयुक्त वारे पुन्हा खेचून आणत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही सिस्टीम ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार आहे, ज्यामुळे पूर्व भारतात पावसाचा जोर वाढेल.
त्यानंतरच्या आठवड्यात याचा प्रभाव मध्य आणि उत्तर भारतापर्यंत पोहोचेल. सॅटेलाईट फोटोंमध्ये ढगांची मोठी गर्दी आधीच दिसू लागली आहे, ज्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हा नवीन बदल पावसाची तूट भरून काढण्यास आणि वाढत्या तापमानापासून दिलासा देण्यास नक्कीच मदत करेल.
Source link



