Uncategorized
राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत साहिल पास्ते याला रौप्य पदक

ओटवणे प्रतिनिधी : नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचा खेळाडू साहिल रवी पास्ते (कलंबिस्त) याने ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. आता त्याची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल साहिल पास्ते याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रीकृष्ण राजन लिंगवत (वेर्ले ) आणि तुकाराम महादेव तायशेटे (दाणोली ) यांनीही सहभाग घेतला होता. मात्र त्यांना या स्पर्धेच्या कॉटर फाइनल स्पर्धेत हार मानावी लागली. साहिल पास्ते, श्रीकृष्ण लिंगवत, तुकाराम तायशेटे या तिघांनाही कोच म्हणुन आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू ऋतिक सावंत (ओवळीये ) यांचे मार्गदर्शन लाभले.
Source link



