Uncategorized

Kolhapur News | कणकवलीत प्रामाणिकपणाचे दर्शन! रिक्षाचालकाने आजींचे २ लाखांचे दागिने आणि रोकड केली परत

                          कणेरीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

गोकुळ शिरगाव – कणेरी येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.१ तोळे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग केली परत.कणेरी फाट्याच्या रिक्षा स्टॉप वरून कोगील बुद्रुक या गावी जात असलेल्या आजी यांचे १ तोळे सोन्याची दागिने व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षा टॉपर विसरून गेल्या. रिक्षाचालक सदाशिव पाटील राहणार कणेरी तालुका करवीर यांना ही पिशवी मिळाल्यानंतर त्यांनी या पिशवी मधील कागदपत्रांच्या आधारे प्रामाणिकपणे त्या वयस्कर असलेल्या आजींना कणेरी रिक्षा स्टॉप वर बोलून त्यांना त्यांची पिशवी परत केली. याबद्दल त्यांचा कणेरी ग्रामस्थांनी व काडसिद्धेश्वर रिक्षा मंडळ यांनी त्यांचा सत्कार केला.

कणेरी फाट्यावर रिक्षाचालक सदाशिव पाटील हे रोजच्याप्रमाणे त्याच्या रिक्षामधून रिक्षा स्टॉप वर उभे होते. यावेळी कोगील बुद्रुक येथील पार्वती लक्ष्मण शिंगटे (वय 82) या आपले बँकेतील काम आटपुन गावी जाण्यासाठी कणेरी फाट्यावरील रिक्षा स्टॉप वर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगेत एक तोळे सोने व रोख रक्कम असे मिळून दोन लाखाचे साहित्य होते. घरी गेल्यानंतर आपली पिशवी हरवल्याचे शिंगटे आजी यांच्या लक्षात आले.

यावेळी या आजींच्या पिशवी मधील त्यांचे आधार कार्ड व इतर कागदपत्र असल्याने या आजी कोगील बुद्रुक च्या आहेत हे लक्षात आल्यानंतर सदाशिव पाटील व इतर रिक्षाचालक सहकार्यानी या आजींना कणेरी फाट्यावरील रिक्षा स्टॉप वर बोलून त्यांची पिशवी व त्यामध्ये असलेले दागिने त्यांना परत दिले. या प्रामाणिकपणाबद्दल या आजीने या सर्वांचे हात जोडून या कलियुगातील तुम्ही राम आहात असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​