Uncategorized

Khidrapur Temple Re-open अखेर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी खुलं.:,प्रशासनाच्या विनंतीला मान :,गाव बंद व ठिया आंदोलन सुरूच….

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामस्थांनी सुरु केलेलं बेमुदत मंदिर बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. प्रशासनाच्या विनंतीवरुन हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिर प्रवेश पर्यटकांसाठी सुरु असला तरी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मात्र सुरुच ठेवले आहे. 

वादाचा मुद्दा काय?

भारतीय पुरातत्त्व विभागाने खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या ताब्यात असलेल्या शंभर ते तीनशे मीटर जागेतील परिसरात बांधकामे करण्यास मनाई केली आहे. या भागातील अतिक्रमित बांधकामे पाडण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नवीन बांधकामे करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयाला ग्रामस्थांतून विरोध होत आहे. या कारवाई विरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी शनिवारी गावाच्या प्रवेशद्वारावर महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.. या आंदोलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्राळकर यांनी भेट दिली होती. 

ग्रामस्थांची भूमिका

ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असले तरी गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता पत्रके, मालमत्ता पत्रक तसेच शेतीची कागदपत्रे आहेत. तथापि, काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​